मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘टी-सीरिज’ने मागितली माफी

mns

मुंबई : पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचं गाण युट्यूबला अपलोड केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितले होते. हटविले नाही तर महागात पडेल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर आता भूषण कुमारने मनसेची जाहीर माफी मागितली असून त्याने त्याच्या युट्यूब वाहिनीवरून आतिफ अस्लमची गाणीदेखील हटविली आहेत.

भाजपने शिवसेनेला करून दिली शहराच्या नामांतराची आठवण

“भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल,” अशा शब्दांत मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून इशारा दिला होता. यानंतर टी-सीरिजने जाहीर माफी मागितली आहे.

दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये ‘मनसे गद्दाराची’ केली ‘हकालपट्टी’

टी-सिरिजकडून माफी मागणारं पत्र पाठवण्यात आलेलं असून मनसेने ट्विटरवर शेअर केलं आहे. “हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं होतं. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी खात्री देतो,” अशी हमी टी-सीरिजने दिली आहे. या पत्रात त्यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची खात्रीही दिली आहे.