fbpx

मशीदच बांधायची असेल तर अब्दुल कलामांची बांधा, आम्ही तिथे माथा टेकू – टी राजासिंह

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या आयोध्या राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद जोरात सुरु आहे. हिंदूत्ववादी संघटनान कडून आयोध्येत राम मंदिर उभारावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुस्लीम संघटनांन कडून या मंदिराला विरोध होत आहे. अशा या ज्वलंत आणि प्रलंबित विषयावर अनेकांकडून अनेक तऱ्हेची वक्तव्य होत आहेत. असेच एक वक्तव्य तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंह यांनी देखील केले आहे. मशीदच बांधायची असेल तर अब्दुल कलामांची बांधा, आम्ही तिथे माथा टेकू, अस वक्तव्य आमदार टी राजासिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

आमदार टी राजासिंह हे सध्या महाराष्ट्रात असून त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमधून देशात हिंदू राष्ट्र बनविण्याचा संकल्प टी राजासिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान टी राजासिंह एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की ,मशीद बांधायला आमचा विरोध असल्याचे म्हटले. कारण, बाबर हा भारतीय नव्हता, तो परदेशातून भारतात आक्रमक बनून आला होता. त्यामुळे त्याची मशीद भारतात बांधायची गरज नाही. जर, मशीदच बांधायची असेल तर अब्दुल कलामांची बांधा, आम्ही तिथे माथा टेकू. तसेच तेलंगणात मशिदीच्या जमिनी लाटून एमआयएमचे आमदार मोठे झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पुढे टी रामचंद्र म्हणाले की , २०२३ पर्यंत देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची शपथ घेतली आहे. तसेच संघाच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत. मी सनातनचा कार्यकर्ता असून आमचा आणि आरएसएसचा काहीही संबंध नाही. मात्र, जो संघाच्या शाखेत जात नाही, तो हिंदू नाही. असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक हिंदूने आपल्या कुटुंबातील एक मुलगा संघाच्या शाखेत पाठवला पाहिजे. जो पुढे चालून देश आणि धर्माचे रक्षण करेल. असा सल्ला देखील त्यांनी दिला.

1 Comment

Click here to post a comment