आरोग्य विभागाच्या परीक्षेवर टांगती तलवार!

Aurangabad High court

औरंगाबाद : येत्या २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागातील विविध पदे भरण्यासाठी परिक्षा होणार आहे. अनेक पदासाठी अर्ज करण्याची मुभा असलेल्या या भरतीची परिक्षा एकाच दिवशी होत असल्याने उमेदवारांची गैरसोय होत आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी रविवारी आक्षेप घेत एकाच होणाऱ्या दोन पदांच्या परिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. याच परीक्षेला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले आहे.

औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमुर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी राज्य शासन आणि आरोग्य विभागाला यासंदर्भांत नोटीस बजावली आहे. याचिकेची पुढील सुनावनी ही २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. २०१९ मध्ये राज्य सरकारच्या वतीने आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला. मात्र सर्व पदांची परीक्षा ही एकाच दिवशी घेतली जाईल असे आरोग्य विभागाने पहिले जाहिर केले नव्हते.

या परिस्थीतीत ज्या विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज केला आहे, एकाच दिवशी दोन परीक्षा आणि वेगवेगळ्या शहरात होत असेल तर उमेदवारांची गैरसोय होईल. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी देणे शक्य नाही. यामुळे उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. विष्णू यादवराव पाटील व अॅड. स्वप्निल तावशीकर यांनी काम पाहिले. परिस्थीती पाहता अरोग्य विभागाची २८ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या