स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी

काळा पैसा

नवी दिल्ली- लवकरच स्विस बँकेतील धनकुबेरांची तिसरी यादी प्रसिद्ध होणार असून भारतातील काळा पैसा खातेधारकांची माहिती स्विस बँक या महिन्यात देणार असल्याची माहिती मिळत आहे. स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या मालमत्तेच्या स्थावर मालमत्तेची माहितीही पहिल्यांदाच दिली जाणार आहे. काळ्या पैशाविरोधातील लढ्यात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

काळ्या पैशाविराेधातील लढ्यामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दाेन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, आतापर्यंत स्विस बॅंकेतील भारतीय खात्यांची सविस्तर माहिती भारत सरकारला मिळली हाेती. मात्र, आता प्रथमच तेथे भारतीयांनी खरेदी केलेल्या सदनिका, घरे तसेच इतर स्थावर मालमत्तेची माहिती देण्यात येणार आहे.भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हा स्वर्ग असून केवळ काळ्या पैशाची तेथे गुंतवणूक हाेते, ही प्रतिमा बदलण्याचे स्वित्झर्लंडचे प्रयत्न आहेत

ही माहिती ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फोर्मेशन (AEOI) अंतर्गत देण्यात आली आहे. पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकीच्या अचल संपत्तीचा तपशील या सेटमध्ये असेल. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महत्त्वाची माहिती या यादीत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीयांचे स्वित्झर्लंडमध्ये किती फ्लॅट आणि अपार्टमेंट आहेत. त्यासोबतच अशा संपत्तीवर किती कर भरायचा आहे, यासंदर्भात माहिती समोर येईल.

महत्वाच्या बातम्या :