swipe elite sense: स्वाईपचा एलीट सेन्स सादर

स्वाईप कंपनीने एलीट सेन्स हा स्मार्टफोन 7499 रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. यात 5 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल.
यातील कॅमेरे 13 आणि 8 मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यात 2500 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. याची रॅम 3 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 64 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहे.
You might also like
Comments
Loading...