देशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक

Swine flu killed 1,100 people across the country; Among the dead, the number of patients in Maharashtra is highest

नवी दिल्ली : देशभरात स्वाईन फ्लूमुळे १ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे . महाराष्ट्रात पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात तब्बल २२ हजार १८६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गुजरातमध्ये ४ हजार ७४१ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला .