‘स्वीटू’चा ट्रेडिंग डान्सचा व्हिडिओ झाला व्हायरल

anivata

मुंबई : छोटया पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर. या मालिकेतून सर्वांची लाडकी  स्वीटूचा एक ट्रेडिंग व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.

अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग असणाऱ्या एका गाण्यावर डान्स स्टेप्स करतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळया रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाचा सलवार घातला आहे. यामध्ये ती आकर्षक दिसत आहे. तिच्या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स्, कमेंट देत आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालकेतील ओम आणि स्वीटू हे झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय जोडपे आहे. या मालिके अगोदर अन्विता ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने टाईमपास या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या