fbpx

प्रेरणादायी – वीरपत्नी स्वाती महाडिक दहावीच्या अभ्यासक्रमात

Swati_Mahadik

वेबटीम– दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहाणी सांगण्यात आली आहे. लेफ्टनंट स्वाती या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते.

पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणे पसंत केले. स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.