fbpx

‘बीए’च्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख

टीम महारष्ट्र देशा – नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए दुसऱ्यावर्षाच्या इतिहासाच्या मराठी पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित दहशतवादी असा उल्लेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित जहालवादी, दहशतवादी असे शब्द इतिहासाच्या या पुस्तकात वापरण्यात आले आहेत. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतल्यानंतर सावरकरांशी संबंधित असलेल्या भाग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढयात महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित असलेल्या भागात सुधारणा करण्यात येणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

सावरकरांना जहालवादी, दहशतवादी हे शब्द उद्देशून वापरण्यात आलेले नाहीत. हे पुस्तक २००१ साली लिहिण्यात आले होते. ते अजून मी पाहिलेले नाही. हा उल्लेख फक्त मराठी माध्यमाच्या पुस्तकात आला आहे. अनावश्यक वाद आम्हाला निर्माण करायचा नसल्यामुळे हा उल्लेख वगळून आम्ही पुस्तकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असल्याची , माहिती विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायूनंदन यांनी दिली आहे .