स्वराज्यरक्षक फेम प्राजक्ता गायकवाडची नवी मालिका

blank

पुणे: ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या मालिकेला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिला. स्वराज्याचे धाकलं धनी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनासोबतच महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतिहास व माहिती लोकांपर्यंत पोहोचली होती.

तर, या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड हीचे देखील भरभरून कौतुक होत होते. करिअरच्या सुरुवातीलाच चांगली सुरुवात मिळाल्यानंतर प्राजक्ताचा चाहता वर्ग देखील मोठा होत आहे. तर, नांदा सौख्यभरे, संत तुकाराम मालिकेतील संत बहिणाबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनंतर आता ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतुन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नंदुरबार : संकटकाळातील शैक्षणिक प्रगतीबद्दल निती आयोगातर्फे जिल्ह्याचे कौतुक

प्राजक्ताने स्वतःच्या सोशल अकाउंटवरून याचे प्रोमो देखील शेअर केले आहे. या प्रोमोमधून या मालिकेची कथा रहस्यमय व रंजक असणार यात शंका नाही. तर, प्राजक्ता यात प्रमुख भूमिकेत दिसून येणार असून आर्या या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. ती कॉलेज  तरुणीची पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. यासोबतच या मालिकेतून आई काळूबाईच्या मोहिमेचा देखील प्रत्यय येणार असून आर्याच्या आयुष्याशी निगडित काही घटनांना कसा उलगडा मिळणार या बाबत उत्सुकता आहे. तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे देखील या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहेत.

रोहित पवारांच्या ‘या’ संकल्पनेची छत्तीसगढ मध्येही सुरवात…