fbpx

आढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान !

टीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे ओळखीचा आहे. आगामी निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर मी निवडणुक लढवायची तयारी ठेवली पाहिजे, अस शिरूरमध्ये मी म्हणालो होतो, असे अजित पवार जळगावमधील निर्धार परिवर्तन यात्रेत बोलताना म्हणले आहेत.

मी जे म्हणालो होतो त्याचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला, असं म्हणत अजित पवारांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांसोबत लढाई करण्याआधीचं आपली तलवार म्यान केली आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावे अजित पवार म्हणाले होते की, मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या खास शैलीत आज शिरूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केला. शरद पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, असे व्यक्तव्य हि अजित पवार यांनी यावेळी केले. एका शोरूमच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

लोकसभेला, विधानसभेला काय गंमत होते ते कळतच नाही. राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरोधात कुणीही उभे राहिले तरी निवडून येईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. तरीही मागे का सरायचे हा प्रश्नच पडतो. मी स्वतः काल पवार साहेबांना सांगितले आहे की, शिरूर लोकसभेसाठी योग्य उमेदवार मिळत नसेल, तर माझी लोकसभा लढायची तयारी आहे. या मतदार संघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही. अजित पवार जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू, असे मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले होते.

त्यावर तुम्ही शिरूर लोकसभा निवडणुक लढवाचं, असं आव्हान शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवारांना दिलं होतं.

शोध व्यक्तिमत्वाचा :