मुघलांनी देशाला लुटलं नाही, त्यांनी भारतातील हिंदूंचा विकास केला : स्वरा भास्कर

मुंबई : मुक्ताफळे उधळून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी अभिनेत्री स्वर भास्करने पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहे. स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक लेख शेअर केला आहे. ज्यामध्ये मुघलांमुळे भारत श्रीमंत झाल्याचं लिहिण्यात आलं आहे.

मुघल साम्राज्याने देशाला लुटलं नाही, तर त्यांच्यामुळेच देश वैभवसंपन्न झाल्याचं या लेखात म्हणण्यात आलं आहे. ज्याच्याशी सहमत होत स्वराने तो लेख शेअर केला. ज्यामध्ये ‘मुघल भारतात विजेत्याच्या रुपात आले होते, पण, ते कालांतराने भारतीय म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांच्यामुळे देशात व्यापार, रस्ते वाहतूक, बंदरांचा विकास झाला. त्यांच्याच कार्यकाळात भारतातील हिंदूंचा विकास झाला, ते श्रीमंत झाले. इंग्रजांच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या येण्यानंतर या साऱ्याला उतरती कळा लागली.’ असं म्हटलं आहे.