स्वरा भास्कर म्हणाली, ‘आई होण्यासाठी तीन वर्ष पाहावी लागली वाट’!

स्वरा भास्कर म्हणाली, ‘आई होण्यासाठी तीन वर्ष पाहावी लागली वाट’!

Swara Bhaskar

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे ट्रोलचा सामना करावा लागतो, मात्र यावेळी तिच्या आई होण्याच्या निर्णयामुळे तिचे कौतूक होत आहे. ‘नेहमीच फॅमिली हवी होती, मुलं हवी होती,. आणि आता ती वेळ आली असून मी लवकरच आई होणार’ असे स्वराने व्यक्त केले. यासाठी तीन वर्षाचा दीर्ध काळ प्रतिक्षा करावी लागल्याचं ही स्पष्ट केलं आहे.

स्वरा आई होण्याची बातमी खरी असली तरी ती एका दत्तक घेतलेल्या मुलाची आई होणार आहे. तिने त्यासाठी रीतसर रजिस्ट्रेशन केलं असून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. “मी भाग्यवान आहे की मी भारतात राहते. कारण आपल्या देशात अविवाहीत स्त्रीला मुल दत्तक दिले जाते. कारण काही देशात मुल दत्तक घेण्यासाठी लग्न करावे लागते. दत्तक घेण्यापूर्वी खूप अभ्यास केला असं स्वरा म्हणाली.

दरम्यान स्वरा अनेक अनाथालयांना  (Orphanage) भेट दिली आहे. अनेक दत्तक घेतलेल्या मुलांच्या पालकांना भेटली आहे. दत्तक मुलांचीही भेट घेतली आहे. मला त्या प्रत्येकाचा अनुभव जाणून घ्यायचा होता म्हणजे माझा पुढचा प्रवासही सोपा होण्यास मदत होईस. दत्तक प्रकियेचा कालावधी खूप मोठा असतो. यामुळेच मला आई होण्यासाठी खूप वाट पाहावी लागते, या गोष्टीसाठी आता तीन वर्षे उलटली आहेत. मात्र या संपूर्ण प्रवासात मला माझ्या आई-वडीलांची साथ लाभली हे महत्त्वाच आहे.” असे व्यक्त केले. तसेच बऱ्याच काळापासून स्वरा अनाथ मुलांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो या मोहिमेसाठी काम करत आहे. मात्र या तिच्या निर्णयामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

स्वरा भास्करचे काही ग्लॅमरस पहा फोटो.

 

महत्वाच्या बातम्या: