लहारनपणापासून अभिनयात रमलेला ‘स्वप्नील’;४४वा वाढदिवस करतोय साजरा

लहारनपणापासून अभिनयात रमलेला ‘स्वप्नील’;४४वा वाढदिवस करतोय साजरा

swpnil.j

मुंबई : वयाच्या ९ व्या वर्षी ‘रामायण’ या टीव्ही शोमध्ये भगवान रामाचा मुलगा कुशची भूमिक करणारा अभिनेता स्वप्नील जोशी. ता लहानपणीच प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये दिसला नाही, तर नंतरही त्याने अभिनयाने सर्वांचा लोकप्रिय कलाकार ठरला. त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत असून त्याबद्दल माहिती बघू या.

स्वप्नील लहान असताना तो त्याच्या चाळीत गणेशोत्सवाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचा. त्यानंतर तो नाटक आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत असायचा. जेव्हा स्वप्नील अशा नाटकात काम करत होता, तेव्हा ‘श्री कृष्णा’ या मालिकेत कंसची भूमिका साकारणारा अभिनेता विलास रावचे त्याच्याकडे गेले. त्याने स्वप्नीलच्या आई -वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत त्याचा फोटो काढला होता. हे पाहून माध्यमांतील वृत्तानुसार, काही दिवसांनी सागर आर्ट्स प्रॉडक्शन हाऊसमधून त्याच्यासाठी फोन आला होता. त्याने ऑडिशन दिले आणि कुशच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाल्याची माहिती आहे.

त्यानतर रामानंद सागर यांच्या सुपरहिट मालिका ‘श्री कृष्णा’ मध्ये तो भगवान कृष्ण बनला होता. मात्र तत्पूर्वी त्याने वयाच्या ९ व्या वर्षी ‘रामायण’ या टीव्ही शोमध्ये भगवान रामाचा मुलगा कुशची भूमिकाही साकारली होती. एकदा स्वप्नीलने त्याला ही भूमिका कशी मिळाली हे सांगितले होते. त्याने अनेक हिंदी आणि मराठी भाषांमध्येही काम केले आहे. त्याने २०१० मध्ये व्हीआयपीसह कॉमेडी सर्कस महासंग्रामचे विजेतेपदही पटकावले आहे.

दरम्यान कृष्णाच्या पात्रापासून स्वतःला दूर केल्यानंतर स्वप्नीलने काही काळासाठी टीव्ही जगाला निरोप दिला होता. १९९७ मध्ये त्याने ‘अमानत’या मालिकेत पुर्नरागमन केले होते. काही वर्षांनी त्याने कॉमेडीमध्ये लक आजमावला. त्याच्या सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट त्याच्या नावे आहेत. स्वप्नील सध्या ‘कोण होईल मराठी करोडपती’ होस्ट करत आहे. हा शो ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध शोला अनुसुरून बनवण्यात आला आहे. यापूर्वी त्याच्या ‘लाल इश्क’ या मराठी चित्रपटाने पडद्यावर चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत स्वप्नील अजूनही छोट्या पडद्याशी जोडलेला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी वैयक्तिक तसेच सोशल मीडियावर मोठयाप्रमाणात शुभेच्छा देत आहेत.

महत्वाच्या बातम्या