मुंबई : कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षानंतर वारकऱ्यांची वारी सुरू झालेली आहे. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. अनेक भक्त या वारीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामध्ये मराठी कलाकार देखील या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्येच आता स्वप्नील जोशी देखील या वारीमध्ये सहभागी झाला आहे. वारकऱ्यांचा उत्साह, भक्तीमय वातावरण पाहून तो अगदी भारावून गेला.
स्वप्निलने पायवारी दरम्यानचा अनुभव आणि त्यादरम्यान वारकऱ्यांशी साधलेला संवाद याबाबत इंस्टाग्राम वरुन एक खास पोस्ट शेअर केली. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो? पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही.”
पुढे त्याने लिहिले की, “आम्ही चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार. पण खरे हिरो हे वारकरी. वर्षानुवर्षे तहान भूक विसरून, पाई वारी चालतात. पायाला सूज येते. पण मनाची, विचारांची सूज कायमची निघून जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं. लिहायचं खूप आहे पण शब्द सुचत नाहीत. हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावाच.” सध्या स्वप्नीलची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते या पोस्टवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<