केजरीवालांचा मोठा निर्णय; स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार

टीम महाराष्ट्र देशा – राजधानी दिल्ली येथील आम आदमी पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. केजरीवाल सरकार दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू करणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यासोबतच स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरणार आहे. दिल्लीमधील शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली सरकार घेईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत या ऐतिहासिक घोषणेची माहिती दिली आहे. दिल्ली सरकारचं हे क्रांतिकारी पाऊल आहे. देशात पहिल्यांदाच स्वामीनाथन आयोग दिल्लीत लागू केलं जाणार आहे. यासोबतच केजरीवाल यांनी जनतेच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल असंही सांगितलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून गहू या पिकासाठी 2616 रुपये तर धान्यासाठी 2667 रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी लागू करणार असल्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले आहे.

तसेच याबाबत जनेतेच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल, असेही केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे. त्यासाठी [email protected] किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर आपल्या सूचना पाठविण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी एका चार्टद्वारे गहू आणि धान्य पिकांची हेक्टरवर वर्गवारी करून हे दर काढले आहेत.

2 Comments

Click here to post a comment