स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड प्रकरणी विहिंप, बजरंग दलाकडून निषेध

blank

टीम महाराष्ट्र देशा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही तथाकथित कट्टर विद्यार्थ्यांकडून स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करण्यात आली. अशा समाजकंटकां विरोधात आज विहिंप, बजरंग दलवतीने डॉ.डी.वाय.पाटील ACS कॉलेज समोर या घटनेचा निषेद करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे विद्यार्थी, अन्य काही संघटना व कॉलेज मधील विद्यार्थ्यां मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची JNU मधे झालेल्या विटंबनेचा निषेद करावा तेवढा कमीच आहे, अनेक युवकांचे प्रेंरणास्थान असलेले, चरित्रसंपन्न युगपुरुष स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतिचा प्रचार प्रसार साता समुद्रापार नेला, त्यांचा आपल्याच देशात असा अवमान व्हावा ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अशी भावना मंगेश नढे यांनी व्यक्त केली.

JNU विद्यापीठ येथील या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. भविष्यात या विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक हानी पोहोचू नये किंवा अशा अन्य कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नयेत, तसेच देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात यावे , अशी मागणी करत पोलीस प्रशासनाला तसे निवेदन ही देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या :