वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला

टीम महाराष्ट्र देशा – स्वामी अग्निवेश हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली. शुक्रवारी दिल्लीतील दिनदयाल उपाध्याय मार्गावर मारहाण करण्यात आली.

स्वामी अग्निवेश यांना गेल्या महिन्यात झारखंडमधील पाकूर भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अग्निवेश यांनी गोमांस खाण्याच्या समर्थनार्थ तसेच नक्षलवादासंदर्भात केलेल्या विधानांमुळे भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता. यातील व्हिडिओत एक महिला देखील अग्निवेश यांना मारहाण करत असताना दिसत आहे. ‘अग्निवेश परत जा’, अशा घोषणा या तरुणांनी दिल्या.

असा नेता पुन्हा होणे नाही – धनंजय मुंडे