Swadhar scheme: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहाची सोय करण्यात येत असते. पण प्रवेश मर्यादा असल्याकारणाने ज्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ ही नवीन योजना आणली आहे. त्या योजने विषयी जाणून घेऊयात…

योजनेसाठी पात्रता

या योजनेसाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.

ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या ठिकाणचा विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.

सन 2017-2018 पासून प्रवेश घेणारे 11 वी व 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वीनंतर प्रथम वर्ष पदविका, पदवी व पदव्युत्तर पदविका व पदवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण असेल.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक टक्केवारी किमान 50 टक्के असावी.

दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा व कुटूंबाचे / पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित असावा व त्याला कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.

12 वीनंतरच्या तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.

विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय व अभ्यासक्रम यास राज्य शासन व संबंधित तत्सम सक्षम प्राधिकारी यांची मान्यता असणे आवश्यक आहे.

ही सवलत शैक्षणिक कालावधीत जास्तीजास्त सात वर्षापर्यंत घेता येऊ शकते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.

ॲट्रोसिटी: न्यायालयाच्या निकालाचा अर्थ, समज आणि गैरसमज

विद्यार्थ्यांने खोटी माहिती व कागदपत्र देवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 16 मार्च 2017

अधिक माहितीसाठी खालील लिंक बघा.

https://sjsa.maharashtra.gov.in/sites/default/files/swadhar-website-030317.pdf