राणेंची स्वाभिमानी डरकाळी,भाजपच्या नाकावर टिचून लोकसभा स्वतंत्र लढवणार

नारायण राणे

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी स्वाभिमानी पक्ष लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची स्वाभिमानी घोषणा केली आहे. राणे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असतात आता त्यांनी लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढत असल्याचे सांगत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर किती जागावर लढणार ते निश्चित करणार असल्याचे सांगितले.कणकवलीतल्या पडवे येथील लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading...

यावेळी मात्र ते स्वतः उमेदवार असणार की नाही ? तसेच विधानसभा निवडणूक लढणार आहेत कि नाही ? या प्रश्नांचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.लोकसभा निवडणुकीतही पाच राज्यांच्या निकालाप्रमाणेच धक्का बसेल,तसेच पवारांसाहेबांसोबत झालेल्या बैठकीत कसलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...