अहिल्यादेवी प्रशालेच्या ‘स्वच्छतेच्या नावानं चांगभलं’ एकांकिकेला प्रथम पारितोषिक…

swachata

पुणे, दि. १५ सप्टेंबर : गावा-गावांमध्ये सातत्याने होणारा कचरा… उदासीन नागरिक आणि राजकारणी… हे सर्व चित्र बदलण्यासाठी सरकार एक योजना जाहीर करतं. कचरा आणि प्लास्टिक सरकारकडे जमा करा आणि पैशाच्या स्वरूपात बक्षिसं मिळवा. या योजनेमुळे गावातील सर्व लोक घर, गाव स्वच्छ करण्यासाठी कामाला लागतात. गावा-गावांमध्ये बक्षीस मिळवण्यासाठी राजकीय चढाओढ सुरु होते. बघता बघता सर्व घरे, रस्ते, चौक, गावे स्वच्छ होऊ लागतात. अहिल्यादेवी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्वच्छतेच्या नावानं चांगभलं’ या रंजक एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. या एकांकिकेचे लेखन अद्वैता उमराणीकर यांनी केले तर दिग्दर्शन कंचन सोलापूरकर आणि अनिता जाधवर यांनी केले होते. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आज बक्षीस वितरण उत्साहात पार पडले. पुण्यातील १४ शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

सृष्ठीच्या निर्मितीपासून ते शिवशाही आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यापर्यंतच्या विविध विषयांवर पुण्यातील 14 शाळांनी एकांकिका सादर केल्या. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धा भरत नाट्यमंदिरामध्ये पार पडल्या. स्पर्धेचं बक्षीस वितरण उद्यान प्रसाद कार्यालय येथे झाले. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टच्या वतीने गेली १९ वर्ष सातत्याने पुण्यातील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदा स्पर्धेचे २० वे वर्ष आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री. महेश लिमये म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट करायची ठरवली तर त्यांनी त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. कोणाला डॉक्टर व्हायचे आहे तर कोणाला इंजिनिअर, अभिनेता किंवा अन्य काहीही व्हा. पण जी कोणतीही गोष्ट कराल त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा, त्यावर मास्टरकी मिळवा. त्या क्षेत्रात तुम्हाला आकाश मोकळे असेल. तुम्ही त्या गोष्टीत मास्टर झालात तर जग तुमचे अनुकरण करेल. पालकांनी मुलांमधील कला-गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.
लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी.एल. जोशी म्हणाले कि, शैक्षणिक जीवनात फक्त अभ्यास एके अभ्यास न ठेवता विद्यार्थ्यांमधील युनिकनेस जगासमोर येण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम लायन्स क्लब सातत्याने करत आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळेपण आहे. हे शोधून त्याचं सर्वांसमोर सादरीकरण करून अशा कलागुणांना वाव देऊन त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला पाहिजे अशी भावना जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.

परीक्षक म्हणून दीपाली निरगुडकर व सुप्रिया गोसावी यांनी काम पाहिले. या प्रसंगी ‘यलो’व ‘भिकारी’ या चित्रपटाचे निर्माते श्री. महेश लिमये, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन बी.एल. जोशी, अभय शास्त्री, घनश्याम खलाटे, दीपाली ठाकर, स्पर्धाप्रमुख सीमा दाबके उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –
सांघिक 
प्रथम क्रमांक – अहिल्यादेवी प्रशाला – ‘स्वच्छतेच्या नावानं चांगभलं’
द्वितीय क्रमांक – न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल – ‘आमचं थोडं ऐका’
तृतीय क्रमांक (विभागून) – नु.म.वि. मुलींची शाळा – ‘एकीचं बळ’ / शिवाजी मराठा जिजामाता मुलींचे हायस्कुल – ‘नेत्रदान’
चतुर्थ क्रमांक – सुदरबाई राठी प्रशाला – ‘सृष्टीचे अंतरंग’

दिग्दर्शन

प्रथम क्रमांक – कंचन सोलापूरकर, अनिता जाधवर – ‘स्वच्छतेच्या नावानं चांगभलं’
द्वितीय क्रमांक – योगिनी कानडे – ‘आमचं थोडं ऐका’
तृतीय क्रमांक (विभागून) – धनश्री जोशी, माधुरी लंबाते – ‘एकीचं बळ’ / स्वराली जोशी, भाग्यश्री भावसार – ‘नेत्रदान’
चतुर्थ क्रमांक – मृणालिनी जोशी – ‘सृष्टीचे अंतरंग