महापौरांच्याच प्रभागात कचऱ्याचे ढीग; अन फुकटचे फोटो काढण्यासाठी सगळ्यांची रीघ

pune mayour cleaning

विरेश आंधळकर : सत्य अहिंसा त्याच बरोबर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. या निमित्ताने देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, काही नेते मंडळी फक्त चमकोगिरी करण्यासाठी या मोहिमेत सहभागी झाले होते की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण पुण्यात महापौर आणि आयुक्तांनी ज्या ठिकाणी झाडू मारला त्या ठिकाणी कचराच नसल्याचं समोर आलं आहे.

आज देशभरात महात्मा गांधी यांची 148 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सेलेब्रिटी ,नेतेमंडळीपासून ते सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरून साफ सफाई करत आहेत. मात्र पुण्यात काहीसा वेगळा प्रकार पहायला मिळाला. महापालिकेकडून जे स्वछता अभियान राबविण्यात आले ते अशा ठिकाणी आयोजित करण्यात आलं होत ज्या ठिकाणी कचराच नव्हता. महापौर मुक्ता टिळक पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. मात्र आगोदरच स्वच्छ असलेल्या ठिकाणी हा उपक्रम राबविल्यामुळे स्वच्छ भारत मिशनचा फक्त चमकोगिरी करण्यासाठी वापर करत होते का असा सवाल उपस्थित झाला आहे.

एका बाजूला पुणे शहरात रोजच कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना समोर जाव लागत आहे. तर महापौर आणि इतर लोकांनी केवळ फोटोशेसन करण्यासाठी केलेल्या सफाईमुळे पुणेकरांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे महापौर मुक्ता टिळक ज्या प्रभागातून प्रतिनिधित्व करतात, त्या प्रभागातच अक्षरश कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे शेवटी किती जरी चमकोगिरी केली तरी ‘पब्लिक सब जानती है’ हेच म्हणाव लागेल.

दरम्यान महापौर मुक्त टिळक म्हणाल्या कि, ‘ मी माझ काम प्रामाणिकपणे करत आहे. विरोधकांना कोणत्या गोष्टीवरुण राजकारण करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी आम्ही सफाई केली तिथे झाडाचा पालापाचोळा पडला होता. तो हि कचऱ्याचाच भाग आहे. तर गेली दोन दिवस सुट्टी असल्यामुळे प्रभागात काही ठिकाणी कचरा साचला आहे. मात्र आज संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून लवकरात लवकर कचरा उचलला जाईल’.