दुध आंदोलन आणखीन पेटणार; उद्या राज्यभरात चक्का जामची हाक

पुणे: दुधदर वाढीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला तीन दिवस पूर्ण होवून देखील सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता उद्या राज्यभरात चक्का जामची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे दुध आंदोलन आणखीन तीव्र होणार असल्याच दिसत आहे, राज्यभरातील शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरत लढा आणखीन तीव्र करण्याचे आवाहन खा राजू शेट्टी यांनी केले आहे.

दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात यावं, तसेच ते थेट उत्पादकाच्या खात्यात जमा करावे, अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचे पडसाद राज्यातील विविध भागात दिसत आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे दुधाचे टँकर फोडण्यात आले आहेत. दरम्यान, काल संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे.

दरम्यान, राज्यातून मुंबईकडे जाणारा दुध पुरवठा बंद करण्यात आल्यानंतर गुजरातमधून दुध आणण्याचा प्रयत्न सरकारककडून केला जात आहे, त्यामुळे गुजरातमधून येणारे दुध रोखण्यासाठी खा राजू शेट्टी हे काल रात्रीपासून डहाणू स्टेशनवर तळ ठोकून होते. दुपारच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरआंदोलकांकडून रोखण्यात आली.

You might also like
Comments
Loading...