संतप्त शेतकऱ्यांनी फोडली मंत्री सदाभाऊ खोत यांची गाडी; गाडीवर फेकले गाजर

sadabhau khot

सोलापूर: पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ त्यांच्या गाडीवर हल्ला करत गाडी फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेवेळी सदाभाऊ खोत यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी मतदार संघाकडे पाठ फिरवल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गाडी फोडली. तसेच त्यांचा निषेध म्हणून त्यांच्यावर गाजरे आणि मक्याची कणसे फेकण्यात आल्याच कळतय.

sadabhau khot attack

२०१४ साली सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पराभव केला. दरम्यान, खोत हे सध्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मात्र जेव्हपासून ते मंत्री झाले तेव्हांपासून त्यांनी माढा लोकसभेकडे पाठ फिरवल्याच्या रागातून स्थानिक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज खोत यांच्या विरोधात आंदोलन केले.

sadabhau khot attack

माढा तालुक्यातील रिधोरे येथून खोत हे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली.