दूध दरवाढीवर स्वाभिमानी आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या फोडल्या

पुणे: दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केले जात आहे, संघटनेच्या मागणीवर सरकारकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचे राज्यभरात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये वाढीव दर देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती, सरकारने ही मागणी मान्य केल्यास मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान आज सकाळपासूनच राज्यभरात आंदोलनास सुरुवात झाली असून पुणे तसेच इतर ठिकाणी दुधाच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत.

तर मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याची सुबुद्धी दे म्हणत खासदार राजू शेट्टी आणि पंढरपूर येथे श्री विठ्ठलाला तर पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दुग्धाभिषेक केला आहे.

You might also like
Comments
Loading...