राज्याचे मुख्यमंत्री ‘ढ’ आहेत; पंचाग पाहुण काम करतात – स्वाभिमानी शेतकरी संघटना

पैठण / किरण काळे: भाजप सरकारने फसवी कर्जमाफी करून शेतकऱ्यांची बोळवन केली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस ‘ढ’ असून पंचाग पाहुण काम करतात. सहा महिण्यापासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर एक दमडीही जमा झाली नसल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ. प्रकाश पोकळे यांनी केली आहे. पाटेगाव (ता.पैठण) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जन आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलतांना पोकळे म्हणाले की, न्यायासाठी आपल्याला एकञ यावे लागेल. या ऊस आंदोलनात आपली एक रकमी मागणी असुन ऊसाला ३१०० रूपये भाव जाहिर करावा अन्यथा उद्यापासुन हे आंदोलन पेटनार असुन आंदोलनात गोळीबार झाल्यास पहिली गोळी माझ्यावर असेल, आम्ही जगाचा पोशिंदा, बळीराजा आहोत. येत्या २० नोव्हेंबर रोजी १० लाख शेतकरी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर मंतर मैदानावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकारला जाब विचारणार आहेत.या आंदोलनात राज्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहनही प्रदेशाध्यक्ष डाँ.प्रकाश पोकळे यांनी केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालावलकर,युवक अध्यक्ष अमरसिंह कदम,अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंबादास कोर्डे,अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील,छावाचे जिल्हा सरचिटणीस संजय मोरे,महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे,औरंगाबाद जिल्हाउपाध्यक्ष विजय भंडे,शेवगाव तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,चंद्रकांत झारगड,अन्नदाता शेतकरी संघटनेचे पैठण तालुकाध्यक्ष माऊली मुळे,अ.भा.छावा संघटनेचे पैठण तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते,बद्री बोंबले,वसंत चोरमले,शिवाजी साबळे,करकसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.