fbpx

ऊसाला पहिली उचल ३४०० रुपये द्या; अन्यथा ऊस वाहतूक होवून देणार नाही – राजू शेट्टी

raju-shetty

कोल्हापूर: ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखीन एकदा आक्रमक झाल्याच दिसून येत आहे. सध्याच्या गळीत हंगामात पहिली उचल ३४०० देण्यात यावी, अन्यथा राज्यातील ऊस वाहूतक होवून देणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित १६ व्या ऊस परिषेदत ते बोलत होते. भाजप सरकारने आपली फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

ऊस परिषदेतील मुख्यमुद्दे
सरकार शत्रू देशाकडून कांदा आयात करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.

कांद्याप्रमाणे साखर देखील आयात करण्याचा सरकारचा डाव

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हायलाच हवा , मोदींनी दिलेलं आश्वासन पाळाव

महाराष्ट्राची ताकद दाखवण्यासाठी आता दिल्लीत आंदोलन

 

1 Comment

Click here to post a comment