जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर संतप्त शेतकऱ्यांनी फेकले 2 ट्रॉली टोमॅटो

swabhimani shetkari sanghtna protest against low rates of vegetables

बुलडाणा:- दिवसेंदिवस शेतमालासह भाजीपाल्याचे दरही गडगड आहेत. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. या बद्दलचा एक व्हिडियोही मध्यंतरी सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी 2 ट्रॉली टोमॅटो फेकून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह 100 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत सरकारचा निषेध केला.

यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेले भाजपचे सरकार शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवत असले तरी या सरकारच्या कथणी आणि करणीमध्ये फरक आहे. हेच मागील साडेतीन वर्षात शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांनी सिध्द करून दाखविले आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीला बगल देत या सरकारने कर्जमाफिला खोडा घातला, अदयाप बोंडअळीच्या अनुदाने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. बाजारात कोणत्याच पिकाला भाव नाही. त्यामुळे हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडून शेतकऱ्यांना नुसते गाजर दाखवित असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.

या आंदोलनात टोमॅटो उत्पादक शेतकरी मुधकर शिंगणे, स्वाभिमानीचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, राणा चंदन, कैलास फाटे, भगवानराव मोरे, शे.रफीक शे.करीम,सतीश मोरे, दामोदर इंगोले, महेंद्र जाधव, निवृत्ती शेवाळे, नितीन राजपुत, अनिल वाकोडे, हरिभाऊ उबरहंडे, कडूबा मोरे, शे.सादिक, योगेश पायघन, अमिन खासब,अशोक मुटकुळे,सुधारक तायडे,सरदारसिंग इंगळे,मदन काळे,अमोल तेलंगरे,शशिकांत पाटील, दत्तात्रय जेऊघाले,शे.मुक्तार,मदन काळे,रामेश्वर परिहार,दिपक धनवे,भगतसिंग लोधवाळ गोटु जेऊघाले प्रेममसिंग धनावत,गणेश शिंगणे,दिगंबर हुडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment