fbpx

शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबली पाहिजे ; नाशकात स्वभिमानीचे आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक मधील एनडीसीसी बँक येथे शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबली पाहिजे व शेतीचा लिलाव थांबला पाहिजे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नाशिक येते आंदोलन केले. शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबली पाहिजे व शेतीचा लिलाव थांबला पाहिजे. सध्या एनडीसीसी बँकेने सक्तीची कर्ज वसुली चालवली आहे. अशा अनेक गोष्टी बंद व्हाव्या यासाठी यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एनडीसीसी बँके समोर आंदोलन करण्यात आले.

विशेष म्हंणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त करणारी ही प्रक्रिया तात्काळ थांबावी, शेतकरी दुष्काळामुळे व शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिक जिल्ह्यात कर्जामुळे चार ते पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना सध्या आधाराची गरज आहे, त्यामुळे त्यांची गरज पाहून त्यांना या जाचक कर्जमुक्ती पासून त्यांना आपण आधार द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचेही आंदोलकांनी म्हंटले आहे.