सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत असा उघड संघर्ष सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे आज पुण्यात यासंदर्भातील निर्णयाची घोषणा केली गेली .
सदाभाऊ आणि राजू शेट्टी संघर्ष !
गेल्या चार महिन्यापासून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे . यामध्ये सदाभाऊ खोत हे भाजपची भाषा बोलू लागले आहेत तर राजू शेट्टी हे पूर्णपणे भाजप च्या विरोधात आहेत . त्याच वेळी सदाभाऊ थेटपणे भाजपमध्ये कार्यरत होण्याच्या विचारात आहेत. सोबतीला नवी शेतकरी संघटना ते काढणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने सदाभाऊंप्रकरणी निर्णय घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने विचारलेल्या प्रश्‍नांना सदाभाऊंनी आपल्या धडाकेबाज पद्धतीने उत्तरे देत राजू शेट्टींना लक्ष्य केले होते. चौकशी समितीसमोर स्वत: उपस्थित राहत बाजू मांडली होती. त्यानंतर तीन आठवडे उलटल्यानंतर चौकशी समितीने सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीचा निर्णय जाहीर केलाय.

सदाभाऊ यांच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी ही घोषणा केली . सदाभाऊ खोत यांच्या शेतकऱ्या बद्दल असलेली निष्टा संपल्यामुळे हा निर्णय घेतल्याच दशरथ सावंत यांनी सांगितल .