fbpx

आता घेतल्याशिवाय जाणार नाही, एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचा हल्लाबोल

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील साखर आयुक्तालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे, खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

ऊसदर अधिनियम 1966 नुसार 14 दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याच्या कायदा आहे. मात्र तीन महिने होऊनही थकीत एफआरपीची रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे जोपर्यत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही तसेच ती थकवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा, इशारा खा शेट्टी यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना दिला.

पुण्यातील अलका टॉकीज चौकापासून निघालेल्या मोर्चा साखर आयुक्तालय धडकला. यावेळी पोलिसांनी केलेल्या बॅरिकॅडींगमूळे शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं. आपल्या न्याय मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने मोर्चा काढून देखील शेतकऱ्यांना अडवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.