अखेर ठरलं…! सांगलीची जागा स्वाभिमानीलाच

टीम महाराष्ट्र देशा : महाआघाडीतील सावळ्या गोधळामुळे सांगलीतील आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा वाढला होता. मात्र आता सांगलीची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचं फायनल झालं आहे. आता या जागेवर लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपातील त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी दोन जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानीला हातकणंगले ची जागा सोडण्यात अआली होती,मात्र सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. कदम विरुद्ध पाटील असा कलगीतुरा या ठिकाणी रंगला होता.

अखेर ही जागा स्वभिमानीच्या पदरात पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शेट्टी यांनी याठिकाणी निश्चितच विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.