fbpx

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीत हा उमेदवार

टीम महाराष्ट्र देशा : सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज राजू शेट्टी यांनी केली.

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. ही जागा कॉंग्रेसकडून लढणार किंवा अपक्ष लढणार असं विशाल पाटील यांनी स्पष्ट होतं, परंतु त्यांनी राजू शेट्टी व पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वाभिमानी कडून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीत भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते जर विशाल पाटील यांच्यामागे उभे राहिले तर हा सामना अतिशय चुरशीचा होणार आहे. त्यामुळे सांगलीत यावेळी रंगतदार सामना होईल यात शंका नाही.