सदाभाऊचा निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानीची समिती

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन नेत्यांमधील वाद चांगलाच वाढत असून सदाभाऊ खोत यांना संघटनेत ठेवायचं की नाही याबद्दल आता समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सदाभाऊंना खुलासा विचारून  4 जुलैपर्यंत निर्णय घेणार असल्याच राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

सदाभाऊ खोत आणि माझ्यात वैयक्तिक काही मतभेद नाहीत,  आमचा प्रतिनिधी मंत्री म्हणून त्यांना पाठविण्यात आले आहे. त्यांनी संघटनेचे प्रतिनिधी काम करणे आवश्यक होते. मात्र, ते भाजपचे  प्रतिनिधी असल्यासारख वागत आहे. हे योग्य नसून शिवसेना देखील सत्तेमध्ये आहे. त्याचे मंत्री हे फक्त शिवसेना या संघटनेच्या भूमिकेप्रमाणे काम करतात. तशी भूमिका घेण्याची गरज असल्याच राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषदमध्ये सांगितल आहे .  दरम्यान सदाभाऊ खोत यांना ४ जुलैपर्यंत चौकशी समितीला समोर जाव लागणार आहे . या समितीत प्रकाश पोकळे, रविकांत तुपकर, सतीश काकडे, दशरथ सावंत हे सदस्य असणार आहे. सदाभाऊंचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार या समितीला देण्यात आल्याच  राजू शेट्टी यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगलं आहे . वाद एवढा वाढला की राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना गद्दार घोषित केलं होत.त्यामुळे आता या नेमलेल्या समितीसमोर सदाभाऊ हजर राहतात का? स्वाभिमानीमधील अंतर्गत वाद मिटणार का ?की सदाभाऊंची हकालपट्टी होणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल