राष्ट्रवादीच्या मदतीने राणेंचा सेना- भाजपला धोबीपछाड

rane_

टीम महाराष्ट्र देशा- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतदेखील राणेंच्या पक्षाने भाजपा आणि शिवसेनेचा पराभव केला असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपाच्या संदेश पारकर यांचा पराभव केला.

कणकवली नगरपंचायतीच्या १७ जांगापैकी स्वाभिमान पक्षाला सर्वाधिक १0 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. त्यामुळे स्वाभिमान-राष्ट्रवादीच्या आघाडीला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक सर्वाधिक चुरशीची झाली. कणकवली शहरात बऱ्यापैकी वर्चस्व असलेले संदेश पारकर यांच्यासमोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समीर नलावडे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. अखेर या निवडणुकीत नलावडे यांनी अवघ्या 37 मतांनी पराभव केला.

Loading...

कणकवलीमधील प्रभागानुसार निकाल
प्रभाग क्र. १ – कविता राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ),
प्रभाग क्र. २ – प्रतीक्षा सावंत (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ३ – अभिजित मुसळे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ४ – आबिद नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग क्र. ५ – मेघा गांगण (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ६ – सुमेधा अंधारी (भाजप)
प्रभाग क्र. ७ – सुप्रिया समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ८ – उर्मी योगेश जाधव (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ९ – मेघा सावंत (भाजप),
प्रभाग क्र. १० – माही परुळेकर (शिवसेना),
प्रभाग क्र. ११ – विराज भोसले (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र.१२ – गणेश उर्फ बंडू हर्णे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
प्रभाग क्र. १३ – सुशांत नाईक (शिवसेना)
प्रभाग क्र. १४ – रुपेश नार्वेकर (भाजप)
प्रभाग क्र. १५ – मानसी मुंज (शिवसेना)
प्रभाग क्र. १६ – संजय कामतेकर (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
प्रभाग क्र. १७ – रवींद्र गायकवाड (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ