‘स्वबळाचा नारा’ हा रस्ता वाटतो तितका सोप्पा नक्कीच नाही, औरंगाबादेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना!

औरंगाबाद : महाराष्ट्रातील आगामी सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केली आहे. नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहमती दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादेत होणाऱ्या महापालिका निवडणुकांचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नाऱ्याला दुजोरा जरी दिला असला तरीही शहरातील काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या अनेक जुन्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा फसवा असून काँग्रेसचे संघटन तितके मजबूत नसल्याची कबूली दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची जरी सत्ता असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची होणारी फरफट सर्वश्रुत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी हे त्रिकूट नसण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र गेल्या २५ ते ३० वर्षांपासून औरंगाबादेत सिवसेनेची सत्ता आहे. गत पाच वर्षात शिवसेना-भाजप युती होती. काँग्रेसचे यात केवळ दहा नगरसेवक आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरीही शहरातील परिस्थिती त्याला अनुकूल नाही.

काँग्रेसमध्येच असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले, काँग्रेस पक्षाचा शहरात एकही आमदार, खासदार, मंत्री नाही. स्वबळाचा नारा दिला असला तरीही परिस्थिती अवघड आहे. शासकीय पदे असलेले कुठलेही नेते शहरात नाहीत. प्रवेश सोहळे होत आहेत. मात्र यातील अनेकजण तिकिटासाठीच आले असून तिकीट न भेटल्यास ते पुन्हा पलटी खाऊ शकतात. वॉर्डा-वॉर्डात जाऊन सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे पाहिल्यानंतरच एकुण परिस्थितीचा अंदाज येईल. त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरीही अंतर्गत गटबाजी, आलेली मरगळ यामुळे हा रस्ता वाटतो तितका सोप्पा नक्कीच नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP