fbpx

या पट्ठ्याने तयार केला स्वतःचा देश 

सुयश दीक्षित suyash dixit

टीम महाराष्ट्र देशा – भारतात वेगळ्या राज्यासाठी संघर्ष करताना पहायला मिळतात मात्र  भारतातील एका तरुणाने ‘किंगडम ऑफ दीक्षित’ या नावाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने हा नवा देश तयार केला असून सुयशने थेट संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केल्यामुळे सुयश सध्या चर्चेत आहे.

इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. सुयशनं त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली.सुयशने या देशाचा झेंडाही तयार करून वडिलांची नियुक्ती देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून केली आहे. विशेष म्हणजे फेसबुकवर या ‘देशाचे’ फोटो पोस्ट करत त्याने स्वतःला राजा घोषित केलं आहे.हा प्रदेश म्हणजे आपण स्थापन केलेला नवा देश असल्याचा दावा सुयशने केला आहे.

900 चौरस मीटरचा हा प्रदेश पूर्णपणे वाळंवटी आहे. मी इथे आरामात राहू शकतो, असं सुशयने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी नियम पाळत या जागेवर अधिकृतरित्या झाड लावलं आहे, त्यामुळे हा माझा देश झाला. जर कोणाला हा परत मिळवायचा असेल, तर युद्ध करा (कॉफी पित) असं आवाहनही त्याने केलं आहे.