सुवर्णा मुजुमदार मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

suvarna mujumdar

पुणे : मांजाने गळा कापला गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुण्यातील महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ‘सकाळ’ वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचं रविवारी सकाळी खाजगी रुग्णालयात निधन झालं. हे प्रकरण पुणे पोलिसांनी गंभीर घेतले असून संबंधीत मांजा विक्रेत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पतंग उडविणाऱ्या ५ ते ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुवर्णा बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरुन दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्याभोवती चिनी मांजा गुंडाळला जाऊन त्यांचा गळा कापला गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पतंगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला आहे.

Loading...

सर्वोच्च न्यायालयाने घातक असलेल्या ‘नायलॉन’च्या चिनी मांजावर बंदी घातली आहे. या मांजाचा वापर करू नये, असे आवाहनही प्रशासन व पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. तरीही हा मांजा शहरातील दुकानांमध्ये सर्रासपणे विकला जातो. पतंग उडवताना काही हौशी तरुणांकडून नायलॉनचा चिनी मांजा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या नायलॉनच्या मांजामुळे लहान मुलांसह दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या मांजाने लहान मुले आणि दुचाकीस्वारांचे हात आणि गळा चिरल्याच्या घटना घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजा उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. शहर पोलीस या पतंग विक्रेत्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. हा चिनी मांजा पक्ष्यांसोबतच हा मांजा आता दुचाकीस्वारांच्या जीवावर उठला असून यामुळे लहान मुले देखील जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुवर्णा यांच्या बळीनंतर तरी प्रशासनाला जाग येतेय का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार असून भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून कोणती उपाय योजना पोलिसांकडून केली जातेय यावर देखील लक्ष असणार आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार