fbpx

नगर मधील शिवसैनिकांच्या हत्येनंतर आता शहापूर उपतालुकाप्रमुखाची जाळून हत्या

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर येथील केडगाव मधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाने राज्य हादरले असतानाच आता शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखांच्या संशयास्पद मृत्युमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे काल रात्री एक फोन आल्यानंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत, अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश निमसे हे विकासकाचा व्यवसाय करीत होते ते शहापूर येथील अघई गावात रहात होते. काल रात्री त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर त्यांनी घरी काही न सांगता ते घराबाहेर पडले.आज शुक्रवार रोजी सकाळी भिवंडी तालूक्यातील दिघाशी गावालगत देवचुळे येथे त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला.गणेशपूरी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्या मृतदेहाची निमसे कुटूंबीयांकडून खात्री करून घेतली.त्या नंतर मृतदेह भिवंडीत इंदिरागांधी स्मृती उप जिल्हा रूग्णालयांत आणला़