अखेर पुणेकरांना दिलासा, हेल्मेटसक्ती कारवाईला शहरी भागात स्थगिती

helmet compulsion in pune

पुणे: पोलिसांनकडून पुणे शहरात राबवल्या जाणाऱ्या हेल्मेटसक्ती कारवाईला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावला आहे. शहरी भागात सुरु असणारी हेल्मेटसक्ती स्थगित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. यासंदर्भात शहरातील सर्व आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना पोलिसांना सूचना दिल्या आहेत.

पुणे पोलिसांकडून शहरात मागील चार महिन्यांपासून हेल्मेटसक्ती काटेकोरपणे राबवली जात आहे, दररोज हजारो नागरिकांना शक्तीमुळे दंड भरावा लागत आहे. या विरोधात एकत्र येत सर्वपक्षीय पुणेकरांनी हेल्मेट विरोधी कृतीसमितीची स्थापना केलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर असल्याने नागरिकांची नाराजी आमदारांना परवडणारी नाही, त्यामुळे शहरात लागू केलेली हेल्मेटसक्ती शिथिल करण्याच्या मागणीसाठी शहरातील आठही आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत घेत आपले म्हणणे मांडले होते.

याबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हे लक्षात घेत आज सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलिस करीत असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात शहरी भागात पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्ती करिता वाहन चालकांच्या वर होणाऱ्या कडक कारवाई बाबत व दंड वसुलीबाबत…

Madhuri Misal MLA BJP PUNE. ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 18, 2019