अयोध्या : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान अयोध्येतील डीएम निवासस्थानाबाहेरील फलकाचा रंग बदलण्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. डीएम निवासस्थानाच्या फलकाचा रंग बदलल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.
बोर्ड बदलण्याच्या घटनेला सरकार बदलण्याच्या अट्टाहासाची जोड दिली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अजयकुमार शुक्ला यांना प्रशासनाने निलंबित केले. मात्र, आता याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काहीही बोलायला तयार नाहीत.
दरम्यान, यूपी निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ही घटना घडली आहे. अयोध्येतील डीएम निवासस्थानाचा फलक भगवा ते हिरव्या रंगात बदलून रंगवण्यात आला. यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतरच या बोर्डाला भगवा रंग देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
- खासदार रामदास तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात
- “हा विषय विधानसभेत मांडू,” भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया
- ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला पाकिस्तानी चाहते म्हणाले “अपना ही घर समझो”
- “झुकेंगे नही म्हणणारे…”; व्यंगचित्र ट्विट करत भातखळकरांची शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका
- पिकांवरील रोग व बुरशी वाढली आहे? तर त्वरित करा हे उपाय, अन्यथा…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<