संभाजी भिडेंच्या संरक्षणासाठी हजर नसणाऱ्या पोलिसांचे निलंबन

sambhaji bhide

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे गुरुजींच्या संरक्षणासाठी हजर नसणाऱ्या 5 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर भिडे गुरुजी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. भिडे हे 20 एप्रिलला पुण्याला आले होते. मात्र त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे एकही पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिक्षक शर्मा यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पाच जणांचे निलंबन केले आहे.

संभाजी भिडे यांना सांगली शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून संरक्षण देण्यात येते. संबंधित विभागाचे चार पोलीस कर्मचारी रोज भिडे यांच्यासोबत असतात.