उद्धव ठाकरेंचा शब्द सरकारने पाळला अखेर ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांच निलंबन मागे

टीम महाराष्ट्र देशा : वेतनवाढीसाठी अघोषित बंद पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवरील केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल 1 हजार 10 कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून कामावरुन कमी करण्यात आले होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद देत संपकरी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. तसंच 1 जुलैपासून त्या कर्मचाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश एसटी प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.Loading…


Loading…

Loading...