जिल्हा पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई,कामचुकार १५ पोलीस कर्मचारी निलंबित

Maharashtra-Police

टीम महाराष्ट्र देशा– आजारी नसतानाही आजारपणाची रजा घेऊन कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातील 15 पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी निलंबित केलं आहे. बेशिस्त वर्तणूकीबद्दल या 15 पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस दलातील १५ कर्मचारी आजारी असल्याचे खोटे कारण सांगून रजा घेत होते. वास्तविक पाहता हे सर्वजण आजारी नसल्याचे दिसून आले. कर्तव्यात कसूर करुन ते कामावर येण्यास टाळत होते. याप्रकरणी गुप्त पद्धतीने चौकशी केली असता तथ्य बाहेर आले. यामुळे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या १५ कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित केले. या सर्वांना पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.