वारकऱ्यांंच्या भावना दुखवणाऱ्या आव्हाडांचे निलंबन करा, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे बागडेंंना पत्र

Jitendra-Awhad

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आव्हाड यांनी गीतेमधील श्लोकावरून झालेल्या वादावर भाष्य केलं होतं. याच व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. संतांचा अपमान केल्याचा मुद्द्यावरून आधीच वारकरी संप्रदाय संतप्त झाला असतानाच आता राजकीय रंग सुद्धा आता या प्रकरणाला येवू लागला आहे. आव्हाड यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा आषाढी वारी संपल्यावर आव्हाडांच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान,वाद निर्माण होऊ लागताच आव्हाड यांनी तो व्हिडीओ हटवला. संत तुकाराम महाराजांचा खून झाला हे वारकरी संप्रदाय कधीही मान्य करू शकत नाही. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे जर कोणाला मान्य करायचे नसेल तर त्यांनी ते करू नये पण त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. आव्हाडांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही वारकरी संप्रदायाने केली आहे.तर दुसऱ्या बाजूला आव्हाडांचे थेट निलंबनच करावे अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहण्यात आले आहे.

नेमका कोणत्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे.

1) श्रीसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला.

2) सावता महाराज यांचा उल्लेख सावता माळ्या असा केला.

3) श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत सावता महाराज, श्रीसंत चोखामेळा,श्रीसंत ज्ञानेश्वर यांचा एकेरी उल्लेख शब्दातून केला.

4) श्रीसंत चोखामेळा यांचा उल्लेख जाणीवपूर्वक चोखा महार असा जातीवाचक केला.

… अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड

Breaking: अखेर जितेंद्र आव्हाडांनी पाकिस्तानी साखरेचे गोडाऊन फोडले

आ. जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान