कीटकनाशक बोगस बिलाच्या दुसऱ्या प्रकरणात संशयित आरोपीस सूट

प्रतिनिधी (राजू म्हस्के ) – औरंगाबाद महानगरपालिकेत अजंटा पेस्ट कंट्रोल एजन्सीने किटकनाशक फवारणी केल्याचे बोगस बिल दाखल केले होते. ही बाब तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या लक्षात आल्यावर जानेवारी महिन्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दुसरा गुन्हा 3 फेब्रुवारी 2017 रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. बोगस बिलाच्या फाईल मध्ये काम केल्याचे व्हाऊचर, बरोबरच तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची व काही मनपा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बोगस बिल दाखल करण्यात आले होते.

बोगस बिलाच्या दुसऱ्या प्रकरणात योगिता ठोंबरे, सुशांत देशपांडे आणि एक अनोळखी इसम असे तिघांनी मिळून गुन्हा केल्याचे नमूद केले होते. या प्रकरणत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या मार्गदर्शना खाली तपास करतांना, नावे दिलेले दोनच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे अनोळखी इसम शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. तर या प्रकरणाचा अधिक तपास करून दोनच आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखलही करण्यात आली आहे.

एकाच एजन्सीच्या नावे दोन बोगस बिलाच्या फाईली दाखल करण्यात आल्या, दोन्ही प्रकरणात मनपा तर्फे 15 दिवसाच्या अंतराने फिर्याद देण्यात आली. सिटी चौक पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. त्यात एका गुन्ह्यात एक आरोपी आणि दुसऱ्या गुन्ह्यात दोन आरोपी, दाखवले. दोन्ही गुन्हे सारखे असताना दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी सारखेच पाहिजे होते. या दोन्ही गुन्ह्यात सुशांत देशपांडे, रामदास ठोंबरे आणि मनपात कार्यरत असलेल्या एकाचा सहभाग आहे, हे जगजाहीर असताना मुख्य आरोपी आणि त्याला साथ देणारा मनपाचा कर्मचारी हे दोघेही अद्याप मोकाट आहेत. त्यांना ह्या गुन्ह्यातून वगळण्यात आले असल्याची माहिती एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

You might also like
Comments
Loading...