Share

Sushma Andhare | “प्रकाश आंबेडकरांनी मला ओळखायला मी काय…”, सुषमा अंधारेंचा पलटवार

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे अलिकडे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्या अनेक नेत्यांवर टीका-टिप्पणी करत असून आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना धारेवर धरलं आहे. ठाण्यातील कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना प्रकाश आंबेडकर यांनी आपण अंधारे यांना ओळखत नसल्याचं म्हटलं होतं.

सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांची प्रतिक्रिया –

प्रकाश आंबेडकर यांनी मला ओळखत नसल्याचं विधान केल्याने काही भावंडांना थोडसं वाईट वाटलं आणि ते चिडून काहीही लिहीत आहेत. पण मला वाटतं आपण चिडू नये. कदाचित नसतील ते ओळखत, काय हरकत आहे ? मला त्यांनी ओळखावं यासाठी मी काही देवेंद्र फडणवीस नाही किंवा आरएसएसचा फार मोठा पदाधिकारी नाही, किंवा कुणी मुख्यमंत्री अथवा या देशाचा पंतप्रधान नाही किंवा मी फार कुणी मोठी अब्जाधीश व्यक्ती नाही किंवा मला फार मोठा भव्य दिव्य काही राजकीय वारसाही नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

यादरम्यान, माझ्यासारख्या वंचितांची ओळख त्यांना असावी हे अपेक्षितही नाही. पण मी त्यांना ओळखते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावातील आंबेडकर नाव हे त्यांच्या नावाशी जोडलेले आहे. त्यामुळे मी त्यांना निश्चितच ओळखते.त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना जशी प्रत्येक वाढदिवसाला करते तशीच आजही करते, असं देखील सुषणा अंधारे म्हणाल्या.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar )

दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. यावेळी ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील एका भाषणावरून सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या भाषणात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती. याविषयी प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देत, कोण या सुषमा अंधारे, यांना मी ओळखत नाही. चळवळीच्या ठिकाणी माझी त्यांच्याशी भेट झाली असे मला वाटत नाही. चारित्र्य बघायला पाहिजे. केतकीने सुद्धा मिमिक्री केली. तिनं रिट्वीट केलं. तिच्यावर कारवाई झाली की नाही? लोकं शहाणे झाले आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे अलिकडे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्या अनेक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics