Sushma Andhare । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत ५० आमदार सोबत घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. यामध्ये शिवसेनेचे ४० आमदार होते. यानंतर शिवसेनेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक महापालिकेतील नगरसेवक आणि त्यानंतर तब्बल १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल आहे. सध्या शिवसेनेची सुरु असलेली गळती थांबण्याचं दिसत नाहीये. मात्र त्यातच आता शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडलं आहे, यानंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिव शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, यापुर्वी सुषमा अंधारे राष्ट्रवादी पक्षात होत्या. मात्र त्यांच्या घोषणेनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमाताई अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमाताई अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही सातत्याने निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Sambhu Raje Desai : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराजे देसाईंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath shinde | बुलडाण्यातील शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी
- Cabinet meeting : शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान ते सवलत दरात वीज, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
- Deepak Kesarkar | शिवसेना पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरे यांच्यासाठी रिक्त – दीपक केसरकर
- Pravin Darekar : त्याग काय असतो ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं : प्रवीण दरेकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<