Share

Sushma Andhare | “दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही”, सुषमा अंधारेंचा राणेंना खोचक टोला

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांची दोन मुलं नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर खोचक टीका केली आहे. सुषमा अंधारे यांची प्रबोधनयात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील मतदारसंघात पोहोचली. यावेळी त्यांनी भाजप पक्षावर तसेच राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. तसेच त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

नितेश राणे आणि निलेश राणे अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. यावरुन अंधारेंनी घणाघात करताना दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही, असं त्या म्हणाल्या. ही विचारानिंही बारकी असलेली पोरं कोणत्याही भाषेत बोलतात पण फडणवीस काही करत नाहीत, असा टोला देखील अंधारेंनी लगावला आहे.

यादरम्यान, भाजपने द्वेषमाचं राजकारण सुरू केलंय. ते राजकारण थांबलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे असं केवळ म्हणतात. पण त्यासाठी काही न करता ते वाढवण्यासाठी त्यांनी अमराठी टीम तयार केली आहे. किरीट सोमय्या, राणा दाम्पत्य असे अनेक लोकं फडणवीसांनी उभी केली आहेत, असा घणाघात देखील सुषमा अंधारेंनी भाजप पक्षावर केला आहे.

सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ लावून भाषण केला. याचवेळी, लाव रे तो व्हिडिओ हा त्यांचा उर्मटपणा. आपण दादा व्हिडिओ लाव म्हणू”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला, असा टोला अंधारेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नारायण राणे (Narayan Rane) …

पुढे वाचा

Diwali Artical Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now