Sushma Andhare | मुंबई : रविवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडलेल्या गटाध्यक्षांच्या मेळाव्या बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. यावर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही राज ठाकरे यांना सुनावलं आहे.
“शिळ्या कढीला ऊत आणणे म्हणजे काय? हे राज ठाकरेंकडून शिकण्याची गरज आहे”, असा टोला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीं लगावला आहे. “भोंगे उतरवण्याबाबत त्यांनी बोलत राहावं, पण भोंगे उतरल्यानं महाराष्ट्राचं कोणतं नवनिर्माण होणार आहे? यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले प्रकल्प परत येणार आहेत का? बेरोजगारांना रोजगार मिळणार आहेत का?”, असे सवाल त्यांनी केले आहेत.
तसेच गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तारांसारखे नेते बेलगाम बोलल्याने निर्माण झालेल्या महिला सुरक्षेच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का? याची उत्तरं होकारार्थी असल्यास आम्ही सुद्धा तुमच्या सोबत भोंगे उतरवायला तयार राहू”, असं अधारे म्हणाल्या. सुपारीबाज आंदोलन बंद केली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिलाय.
पुढे त्या म्हणतात, “मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहात आहे असं तुम्ही सांगता. पण नेमकं तुम्ही काय निर्माण करू पाहात आहात. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांबद्दल आपण काहीच बोलू इच्छित नाही. त्यांच्या पायउतार होण्याबाबत तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- Aravind Sawant | “ज्या डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंवर उपचार केले…”; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर
- Ambadas Danve | राज ठाकरे भाजपचीच भूमिका मांडत आहेत – अंबादास दानवे
- Winter Health Care | हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Sanjay Raut | “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर…”; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
- Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी